लाला लजपतराय यांना स्मृतिदिनी शतशः नमन! | Death Anniversary of Lala Lajpat Rai

2021-04-28 171

पंजाबचे एक जहाल नेतृत्व म्हणून लाला लजपतराय यांची ओळख होती. सिंहासारख्या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणून संबोधले जायचे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता हा सिंह जखमी झाला, पण त्यांनी पेटवलेल्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले आणि ब्रिटीश हुकुमत हदरून गेली.